नागपूर/ललित लांजेवार:
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर ऊर्जा सुरक्षा, अर्थव्यवस्था आणि व्यापारावर मोठा परिणाम होत असून, त्याचे पडसाद आता भारतीय पोल्ट्री उद्योगातही तीव्रतेने उमटत आहेत. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा थेट परिणाम भारतातील फीड खर्च आणि अंड्यांच्या बाजारभावावर दिसून येत आहे.
फीड खर्चात मोठी वाढ – अॅमिनो अॅसिड्स ठरले कारण
सध्या पोल्ट्री उद्योगासमोर उभे राहिलेले सर्वात मोठे आव्हान म्हणजे अॅमिनो अॅसिड्स आणि फीड सप्लिमेंट्सच्या वाढत्या किमती. प्राण्यांच्या शरीरात प्रथिनांच्या निर्मितीसाठी लायसिन, मिथायोनाइन, थ्रिओनाइन आणि ट्रिप्टोफॅन यांसारखी अॅमिनो अॅसिड्स अत्यावश्यक असतात. याशिवाय मिनरल मिक्स्चर, व्हिटॅमिन A, D3, E, B-कॉम्प्लेक्स, प्रोबायोटिक्स आणि फायटेजसारख्या एंझाइम्सचा वापर फीडची गुणवत्ता सुधारण्यासाठी केला जातो.
या सर्व घटकांचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून असल्याने, युद्धामुळे जागतिक पुरवठा विस्कळीत झाला आणि दरात झपाट्याने वाढ झाली. गेल्या काही आठवड्यांत या घटकांच्या किमती वाढल्याने पोल्ट्री फीड खर्चात किमान १०% वाढ झाल्याचे उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अंड्यांच्या निर्यातीवर परिणाम, दरात घसरण
याच काळात मध्यपूर्वेतील परिस्थितीमुळे अंड्यांच्या निर्यातीवरही मोठा परिणाम झाला आहे. सौदी अरेबियाने अन्न सुरक्षेच्या कारणास्तव ४० देशांमधून कोंबडीचे मांस आणि अंड्यांच्या आयातीवर बंदी घातली आहे. त्यातच युद्धामुळे बंदरे आणि हवाई मार्गांवर निर्बंध आल्याने निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे.
तामिळनाडूतील नामक्कल, जे भारतातील अंडा उत्पादन आणि निर्यातीचे प्रमुख केंद्र आहे, तेथील निर्यातदारांना मोठा फटका बसला आहे. परदेशी बाजारपेठांमध्ये अंड्यांची विक्री थांबल्याने साठा वाढला असून, तो देशांतर्गत बाजारात कमी दरात विकावा लागत आहे.
सध्या उत्पादन खर्च सुमारे ₹4.50 प्रति अंडा असताना विक्री दर ₹3.50 पर्यंत घसरला आहे. यामुळे दररोज सुमारे ₹5 कोटींचे नुकसान होत असल्याचा अंदाज निर्यातदारांनी व्यक्त केला आहे.
उद्योगासमोर कठीण परिस्थिती
फीड खर्च वाढ आणि अंड्यांच्या दरात घसरण या दुहेरी फटक्यामुळे लेयर पोल्ट्री शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. विशेष म्हणजे, देशाच्या ईशान्य भागात मागील १५ दिवसांत फीडच्या दरात प्रति ५० किलो बॅगमागे ₹१५० ते ₹२०० पर्यंत वाढ झाली असून, त्याचा परिणाम संपूर्ण देशभर जाणवू लागला आहे.
“मेक इन इंडिया”साठी मोठी संधीपोल्ट्री क्षेत्रातील युवा अभ्यासक ललित लांजेवार यांच्या मते, “या संकटामुळे भारतासमोर मोठी संधी निर्माण झाली आहे. अॅमिनो अॅसिड्स आणि फीड-ग्रेड इनपुट्सच्या (पशुखाद्य घटक) देशांतर्गत उत्पादनावर भर देण्याची हीच योग्य वेळ आहे.”सध्या भारत लायसिन, मिथायोनाइन आणि थ्रिओनाइन यांसारख्या घटकावर इतर देशांवर अवलंबून आहे. परंतु भारतात मोलॅसेस (गुळाचा उपपदार्थ) मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने फर्मेंटेशन (किण्वन) आधारित उद्योग उभारण्याची मोठी क्षमता आहे.या क्षेत्रात गुंतवणूक केल्यास:आयातीवरील अवलंबित्व कमी होईलपरकीय चलनाची बचत होईलपशुखाद्य आणि औषध उद्योगाला स्वस्त कच्चा माल मिळेलग्रामीण भागात रोजगार निर्मिती होईलपुढील वाटचालसध्याची जागतिक अस्थिरता पाहता, भारताने फीड सुरक्षा मजबूत करणे अत्यावश्यक झाले आहे. अॅमिनो अॅसिड उत्पादनात आत्मनिर्भरता मिळवली तर भारत केवळ देशांतर्गत गरज भागवणार नाही, तर निर्यातदार देश म्हणूनही पुढे येऊ शकतो एकूणच, खाद्याचे दार वाढले जरी असतील तरी मात्र तुलनेत कोंबड्याचे दर मात्र स्थिर आहेत. असे ते सांगतात. जागतिक संघर्षाचा परिणाम भारतीय पोल्ट्री क्षेत्रावर गंभीरपणे जाणवत असून, या संकटातून मार्ग काढण्यासाठी तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.


.jpg)
.jpg)
0 Comments