पुणे: चीनसह जगातील विविध देशांत प्रसार झालेल्या कोराेना या अाजाराची बाधा मांसाहारी पदार्थांचे सेवन केल्यामुळे हाेत असल्याची अफवा साेशल माध्यमांवर पसरल्याने मांसाहार टाळला जात असून यामुळे गेल्या काही दिवसात शहरातील मांसाहारी खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा व्यवसाय तब्बल 60 टक्क्यांनी घटला आहे.
त्यामुळे राज्यात दर दिवशी होणाऱ्या चिकनच्या खपावर परिणाम झाला असून सुमारे 300 हुन जास्त टनांनी विक्री घटल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, करोनाचा प्रसार चिकनमधून होत नसल्याचे सांगून चिकन हे मानवी आहारासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे व नागरिकांनी अशा अफवांकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
करोनाचा प्रसार चिकनमधून होतो, असा अपप्रचार केला जात असून त्याचा सर्वाधिक फटका पोल्ट्री व्यवसायाला बसला आहे. मात्र, चिकनपासून करोनाचा प्रसार होत नाही, त्याबाबत शास्त्रीय माहिती देण्यासाठी पशुसंवर्धन विभाग आणि ससून रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर यांच्यावतीने बीजे वैद्यकिय महाविद्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राज्याचे पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. त्यावेळी डॉ. विनायक लिमये, ससूनचे उपअधिष्टाता डॉ. राजेश कार्यकर्ते, अधीक्षक डॉ. अजय तावरे, उपअधीक्षक डॉ. विजय जाधव उपस्थित होते.
होलसेलमध्ये 75 ते 80 रुपये किलो चिकन विकल्या जाते. मात्र, व्हायरसच्या अफवांनी ती किंमत 40 रुपये प्रतिकिलोवर आलेली आहे. त्यामुळे प्रति कोंबडी 35 ते 40 रुपयांचे नुकसान होत असून दर आठवड्याला शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
केवळ चिकनच नव्हे तर मटण आणि मासोळी विक्रीतही बरीच घट झालेली आहे. अनेक बाजारात मटन विकल्या गेलेले नाही. जोडधंदा म्हणून शेतकरी कुक्कुटपालन, शेळीपालन आणि मासोळीचा व्यवसाय करतात. अंडे विक्री व्यवसायावरही "व्हायरस'चा परिणाम दिसून येत आहे. 4.50 रूपये प्रति नग असलेले अंडे आज बाजारात 3.30 रूपयांनी विकावे लागत आहे.
चिकन होलसेल रेट जरी 40 ते 50 रुपये किलोवर उतरला असेल, तरी मात्र बाजारात चिल्लर विक्री 160 ते 170 रुपये तर चिकन हंडी ही 350 ते 450 रुपये हॉटेलमध्ये पूर्वीच्याच भावात विकल्या जात आहे.
शुक्रवारी 2 किलोसाठी नागपूर,अमरावती, यवतमाळ ,वर्धा गोंदिया ,चंद्रपूर ,वाशिम ,बुलढाणा 50 रुपया दरानुसार खरेदी करण्यात आली. तर मुलताई, कटंगी आणि शिवनी येथे 52 रुपये दराने होलसेल चिकन खरेदी करण्यात आली
त्यामुळे जरी चिकन खरेदीचे रेट कमी असले तरी व्यापारी व हॉटेल मालक चांगलाच मुनाफा कमवत आहेत. मात्र शेतकऱ्याला 40 रुपये प्रतिकिलो माग नुकसान सहन करावा लागत आहे.
अश्या नुकसानाची झड पोल्ट्री फार्म फीड कंपनी चिक्स कंपन्या यांना बसत आहे सरकारने चिकन मध्ये करणार नाही अशी जरी पत्र काढले असेल तरी मात्र मोठ्या सिनेकलाकाराच्या माध्यमातून जाहिरात केल्यानंतरच पोल्ट्री व्यवसाय स्थिर होण्यास मदत होणार आहे.
0 Comments