disable text

Ticker

6/recent/ticker-posts

धक्कादायक:नागपुरात सर्वेसाठी गेलेल्या महिला डॉक्टरवर ॲसिड हल्ला

नागपूर/ललित लांजेवार:
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील शिक्षिकेवर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना ताजी असतानाच नागपुरात देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनवर सर्वे करण्यासाठी आलेल्या सर्व्हे टीम मधील महिला डॉक्टरवर शिका एका माथेफिरूने ॲसिड हल्ला केल्याने चांगलीच खळबळ उडाली.ही घटना नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्‍यातील पहलेपार येथे गुरूवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली.नीलेश कनेरे(22, रा. बाजारचौक, सावनेर) असे आरोपी मा्थेफिरूचे नाव आहे.
नागपुरातील तीन डॉक्टर व सावनेर मधील 2 डॉक्टर सर्वेसाठी गेले होते. सर्वे गावात सुरू असताना माथेफिरू युवकाने ॲसिड हल्ला केला. यात डॉ. सोफीया सोमन, सुकन्याकांबळे, शुक्रा जोशी, गवळी सोनेकर व सुरेखा बडे या पाचही जणांवर ॲसिड उडाल्याची माहिती आहे.

घटनेनंतर उपस्थितांनी या माथेफिरू आरोपीला चांगलाच चोप दिल्याचे समजते आहे या घटनेनंतर गावात चांगलेच तणावाचे वातावरण निर्माण झाले.

तर जखमींना नागपुरातील मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच आरोपी माथेफिरू युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महाराष्ट्रात लागोपाठ घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.

Share This

Post a Comment

0 Comments